Merchant Support-Marathi


English

हिन्दी

ಕನ್ನಡ
தமிழ்
తెలుగు
ലയാളം
ગુજરાતી
বাঙালি

मर्चंट सपोर्ट

पेमेंट आणि बँक ट्रान्सफर

माझे पेमेंट बँकेमध्ये केव्हा ट्रान्सफर केले जाते

आपले पेमेंट ट्रॅन्झॅक्शन च्या दुसऱ्या दिवशी बँकेमध्ये ट्रान्सफर केले जाते. उदाहरणार्थ, जर  आपण आज संध्याकाळी ट्रॅन्झॅक्शन करता तर उद्या संध्याकाळ पर्यंत आपल्या बँकेमध्ये हे   ट्रान्सफर होईल.

जर मला पुढील दिवशी पेमेंट मिळाले नाही, तर काय होईल? 

जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी पेमेंट मिळाले नाही तर, आम्ही तुम्हाला आणखी 72 तास थांबावे अशी विनंती करतो कारण आम्ही पुढील 3 तासांपर्यंत स्वयंचलितपणे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी प्रयत्न करत असतो. जर तरीही पैसे ट्रान्सफर झाले नाहीत तर, तुम्ही आमचा हेल्प डेस्क नंबर 0120- 4440440 वर रिक्वेस्ट करू शकता. 

मी माझी पेमेंट्स / बँक हस्तांतरणे कशी ट्रॅक करू शकतो?

आपल्या पेमेंट्सचे / बँक हस्तांतरणांचे ट्रॅक्रिंग करण्यासाठीPaytm for Business app वर खालील पायऱ्यांचे पालन करा.

केलेल्या पेमेंटसाठी:

 • Paytm Business app उघडा, टॅप करा >> पेमेंट्स >> वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या कॅलेंडरमधून इच्छित तारखा निवडा
 • सर्व पेमेंट्स तारीख आणि रिसीव्हर नंबरसह दिसतील. आपण स्टेटमेंट सुद्धा डाउनलोड करू शकता.

सेटल्ड / बँक हस्तांतरणासाठी:

 • Paytm Business app उघडा, टॅप करा >> बॅंक हस्तांतरण >> वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या कॅलेंडरमधून इच्छित तारखा निवडा.
 • सर्व स्वीकारलेली पेमेंट्स त्यांच्या तारखा आणि सेटलमेंटच्या वेळेसहित दिसतील. आपण स्टेटमेंट सुद्धा डाऊनलोड करू शकता.

मी आपल्या बँक पासबूक शी कशी सुसंगती साधू शकतो? 

आपल्या खात्यात झालेल्या प्रत्येक हस्तांतरणासाठी एक UTR नंबर उपलब्ध आहे. आपण खाली दिलेल्या पायऱ्यांचे पालन करून व्यवहारासासोबत पाठवण्यात आलेल्या SMS मध्ये किंवा Paytm for Business app वर UTR चेक करू शकता (डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा):

बँक सेटलमेंटसाठी:

 1. बिझनेस अॅपवर बँक ट्रान्सफर टॅब मध्ये जा
 2. उजवीकडे वरच्या कोपऱ्यात असलेल्या कॅलेंडर आयकॉनवर व्यवहाराची तारीख निवडा जी आपल्याला मेल करायची आहे.
 3. आपल्या खात्यात सेटल करण्यात आलेल्या प्रत्येक व्यवहारासह एकूण रक्कम वर दिसेल.
 4. UTR नंबर शोधण्यासाठी कोणत्याही व्यवहारावर टॅप करा

व्यवहारासंबंधित तोच UTR नंबर आपले बँक पासबुक / स्टेटमेंटमध्ये उपलब्ध होईल. हा सुद्धा जुळवता येईल.

अॅप लॉगिन सेवा

मी बिझनेस अॅप साठी पेटीएम मध्ये लॉगिन करू शकत नाही, मी काय केले पाहिजे?

कृपया त्याच पेटीएम क्रेडेंशियल्स किंवा माहितीचा वापर करून लॉगिन करा, ज्यामुळे तुम्ही  पेटीएम अॅप मध्ये लॉगिन करू शकता, जर तुम्ही पासवर्ड विसरले आहेत, तर “पासवर्ड विसरला” वर क्लिक करून पासवर्ड रीसेट करण्याचा प्रयत्न करा. 

मी आपला पासवर्ड कसा रीसेट करू शकतो?

जर तुम्ही “पासवर्ड विसरला” वर क्लिक करून पासवर्ड रीसेट करू शकत नसाल किंवा पासवर्ड रीसेट करण्यामध्ये कोणतीही समस्या येत असेल तर, कृपया खाली देण्यात आलेल्या स्टेप्स चे पालन करा:

 1. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वरून (0120- 4440440) वर कॉल करा
 2. प्रोफाईल/लॉगिन शी संबंधित समस्या निवडा
 3. पासवर्ड रीसेट करण्यासाठी 1 दाबा आणि आयव्हीआर द्वारे देण्यात येणारी माहिती ऐकल्यानंतर पुन्हा 1 दाबा.
 4. तुमच्या रजिस्टर्ड नंबर वर एसएमएस द्वारे एक पडताळणी किंवा व्हेरीफिकेशन लिंक पाठवली जाईल. 
 5. लिंक वर क्लिक करताच आपल्याला ‘Create new Paytm password’ किंवा “ नवीन पेटीएम पासवर्ड क्रिएट करा” च्या वेब पेज वर नेण्यात येईल
 6. ‘नवीन पासवर्ड”नोंदवा आणि “अपडेट”वर क्लिक करा 
 7. तुमचा पासवर्ड अपडेट होईल

मर्यादा आणि शुल्क

वॉलेट मध्ये पेमेंट स्वीकार करणे

वॉलेटमध्ये देयके स्वीकारणे

पेटीएम प्राइम / केवायसी वॉलेट वापरकर्ता म्हणून, आपण  एका महिन्यामध्ये 1 लाख  रुपये स्वीकारू शकता.   तुम्ही लाभार्थी न जोडता रु. 10,000  आणि  लाभार्थी  जोडून रु. 25000 वॉलेट / बँकेमध्येम पाठवू शकता

लाभार्थी कसा जोडायचा?

कृपया आपल्या पेटीएम अॅपच्या वर उजव्या कोपऱ्यात प्रोफाइल चिन्हावर क्लिक करा.’ लाभार्थी व्यवस्थापित करा” निवडा आणि नंतर आपण पैसे पाठवण्यासाठी नवीन लाभार्थी जोडू शकता.

टिप: आपण अॅपवर ”लाभार्थी जोडा” पर्याय पाहण्यास सक्षम नसल्यास कृपया आपल्या पेटीएम खात्यामधून लॉग आउट करा आणि पुन्हा लॉगिन करा.

Paytm Minimum KYC  ग्राहक म्हणून, आपण आपल्या वॉलेटमध्ये 10,000 रुपयांपर्यंत रक्कम स्विकारू शकता किंवा अॅड करू शकता.आपण आमच्या ऑफलाईन  आणि ऑनलाईन मर्चंट्सकडे पेमेंट्स करू शकता. तसेच दुकान किंवा पेटीएमवर खरेदी किंवा रिचार्ज करू शकता.

Paytm Basic Wallet (a non KYC user ) म्हणून आपण आपल्या वॉलेटमध्ये पैसे अॅड किंवा प्राप्त करू शकत नाही.आपल्या वालेटमध्ये आधीपासूनच पैसे असल्यास, आपण आमच्या ऑफलाईन  आणि ऑनलाईन मर्चंट्सकडे पेमेंट्स करू शकता तसेच दुकान किंवा पेटीएमवर खरेदी किंवा रिचार्ज करू शकता 

तुम्ही हे पैसे दुसऱ्या युजरला किंवा बँकेमध्ये हस्तांतरित करू शकत नाही.

आपली वॉलेट मर्यादा वाढवण्यासाठी  http://m.p-y.tm/KYC  वर क्लिक करा आणि आपल्या पेटीएम अॅपवर देण्यात आलेल्या दस्तऐवजांवरील वैध दस्तऐवज आयडी आणि त्यावर दिलेले नाव  नोंदवा. 

बँक QR कोड मध्ये पेमेंट स्वीकार करणे

पेटीएम सह थेट आपल्या बँक खात्यात देयक स्वीकार करा. बँक QR कोडद्वारे स्वीकारली जाणारी रक्कम स्वयंचलितपणे पुढील दिवसाच्या शेवटी खात्यात सेटल होते. आपल्या खात्यावर लागू असलेल्या शुल्काबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया बिज़नेस विथ पेटीएम अँप किव्हा वेब च्या मर्चन्ट पॅनल वर ‘लिमिट सेक्सशन’ मध्ये पहा.

पेमेंट स्वीकार करणे

मी ग्राहकांद्वारे करण्यात आलेले पेमेंट कसे ट्रॅक करू शकतो? 

खाली देण्यात आलेल्या स्टेप्स चे पालन करून तुम्ही पेमेंट ट्रॅक करू शकता:

 1. बिझनेस अॅप साठी पेटीएम उघडा
 2. अपने पेटीएम रजिस्टर्ड मोबाइल नंबर और पासवर्ड के साथ लॉगिन करेंतुमच्या पेटीएम रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि पासवर्ड सोबत लॉगिन करा डिफॉल्ट रूपाने तुम्ही होम स्क्रीन वर असाल, जिथे तुम्ही अलीकडे प्राप्त झालेले पेमेंट पाहू शकता.स्क्रीन मध्ये सर्वात वर देण्यात आलेल्या रीफ्रेश वर टॅप करा, आता तुम्ही या लिस्ट मध्ये सर्वात वर अलीकडे करण्यात आलेले पेमेंट पाहू शकता.
 3. पेमेंट वर टॅप करा, हे तुम्हाला पुढील स्क्रीन वर घेऊन जाईल, जिथे तुम्ही एका हिरव्या रंगाचे  टिक मार्क पाहू शकता जे कन्फर्म करते कि पेमेंट ग्राहकाच्या मोबाईल नंबरच्या पहिल्या दोन आणि अखेरच्या चार डिजिट सोबत प्राप्त झाले आहे. 
 4. नवीन प्राप्त झालेल्या पेमेंट मध्ये तुम्ही अलीकडील 3 पेमेंट पाहू शकता, “अधिक दर्शवा”  वर टॅप करून तुम्ही पुढील 10 पेमेंट पर्यंत पाहू शकता.  
 5. अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

माझ्याजवळ स्मार्ट फोन नाही, मी पेमेंट कसे ट्रॅक करू शकतो?

जर तुमच्या जवळ कोणताही स्मार्टफोन नाही, तर तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड पेटीएम मोबाईल  नंबर वरून 7053112112 वर एक मिस्ड कॉल द्या आणि आम्ही तुम्हाला खालील माहिती सोबत एक एसएमएस पाठवू.

दिवसाचा त्या वेळेपर्यंचा कलेक्शन बॅलेन्स (उदाहरण- जर तुम्ही 4 वाजता मिस्ड कॉल दिला आहे, तर त्या दिवसाच्या 4 वाजेपर्यंच्या प्राप्त एकूण पेमेंटची माहिती दिली जाईल) 

मी दिवसभरातील प्राप्त पेमेंट पाहू इच्छितो, मी काय केले पाहिजे?

संपूर्ण दिवसामध्ये मिळालेले पेमेंट पाहण्यासाठी, तुम्ही खाली देण्यात आलेल्या स्टेप्स चे पालन करून पेटीएम फॉर बिझनेस अॅप मध्ये ते पाहू शकता.

 • पेटीएम फॉर बिझनेस अॅप उघडा.
 • तुमच्या क्रेडेंशियल्स सोबत लॉगिन करा
 • अॅप स्क्रीन च्या खालील भागामध्ये पेमेंट वर टॅप करा.
 • स्क्रीन च्या वरील उजव्या कोपऱ्यामध्ये वेळेची निवड करण्यासाठी एक ड्रॉप डाउन असेल, त्यावर टॅप करा आणि आजची निवड करा.

संपूर्ण दिवसामध्ये प्राप्त एकूण पेमेंट वैयक्तिक/इंडिविज्युअल पेमेंट तपशील सोबत येथे दिसेल.

जर तुमच्या जवळ स्मार्टफोन नाही तर तुम्ही 7053112112 वर मिस्ड कॉल देऊ शकता, तुम्हाला एक एसएमएस येईल.

मी पेटीएम नोंदणीकृत व्यापारी कसे बनू शकतो?

 1. पेटीएम नोंदणीकृत व्यापारी बनण्यासाठी येथे क्लिक करा आणि पेटीएम लॉगिन आयडी आणि पासवर्ड सोबत लॉग इन करा.
 2. फॉर्म वर सर्व आवश्यक तपशील भरा.
 3. फॉर्म जमा केल्यानंतर, आमची टीम व्यापारी म्हणून नोंदणी करण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधेल.
 4. 50k व्यापारी असल्यामुळे तुम्ही तुमच्या लिंक्ड बँक खात्यामध्ये 0% शुल्कामध्ये  50,000रु पर्यंत स्वीकार करू शकता. 

मला प्राप्त झालेल्या कोणत्याही पेमेंटचा ऑर्डर आयडी कसा मिळेल?
आपल्या खात्यात झालेल्या प्रत्येक पेमेंटसाठी पाठवण्यात आलेल्या SMS मध्ये एक ऑर्डर आयडी उपलब्ध आहे. आपण खाली दिलेल्या पायऱ्यांचे पालन करून Paytm for Business app वर सुद्धा ऑर्डर आयडी पाहू शकता (डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा):

 1. पेटीएम बिझनेस अॅपवर पेमेंट्स टॅब मध्ये जा
 2. उजवीकडे वरच्या कोपऱ्यात असलेल्या कॅलेंडर आयकॉनवर पेमेंटची तारीख निवडा ज्याचा ऑर्डर आयडी आपल्याला हवा आहे.
 3. आपल्या खात्यात सेटल करण्यात आलेल्या प्रत्येक व्यवहारासह एकूण रक्कम वर दिसेल.ल
 4. ऑर्डर आयडी पाहण्यासाठी कोणत्याही व्यवहारावर टॅप करा

योग्य / अयोग्य वापर धोरणे

पेटीएम मर्चंट अकाउंटचा योग्य वापर म्हणजे काय?

 • केवळ ग्राहकांकडून पेमेंट स्वीकारण्यासाठी बिझनेस अ‍ॅप QR किंवा मर्चंट QR कोड वापरणे.
 • केवळ पेटीएम बिझनेस अकाउंट अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या वस्तू आणि सेवांसाठी पेमेंट स्वीकारणे.

पेटीएम सेवांच्या अयोग्य वापराचे उदाहरण काय आहे?

 • ग्राहक नसलेल्या / मर्चंट वर्तनासाठी पेटीएम मर्चंट QR वापरणे.
 • ग्राहकांकडून त्यांच्या बँक अकाउंटमध्ये कॅश बेनिफिट/ पैसे देण्याच्या बदल्यात पेमेंट स्वीकारणे.

या पद्धतींचा परिणाम म्हणून पेटीएमने मर्चंटला दिलेले विशेषाधिकार बंद / प्रतिबंधित होऊ शकतात.
पेटीएमच्या अयोग्य वापरामुळे वॉलेट पे मोड निष्क्रिय केला जाऊ शकतो, आणि भविष्यात पुन्हा सक्रिय केला जाऊ शकतो का?
जर अयोग्य वापरामुळे वॉलेट पे मोड निष्क्रिय केला असेल तर आपण पेटीएम वॉलेटद्वारे स्वीकारलेल्या पेमेंटवर 1.99% + GST शुल्क देण्यास सहमती दर्शवल्यासच पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते.
मी शुल्काशिवाय पेमेंट कसे स्वीकारू शकतो?
कोणत्याही शुल्काशिवाय पेमेंट स्वीकारण्यासाठी तुम्ही UPI / PPBL नेट बँकिंग पे मोडचा वापर करू शकता.

विविध समस्यांविषयी आपल्या शंका दूर करण्यासाठी खाली दिलेल्या आमच्या समर्पित हेल्पलाइन/डेडिकेटेड हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधा.

विविध समस्यांविषयी आपल्या शंका दूर करण्यासाठी खाली दिलेल्या आमच्या समर्पित हेल्पलाइन/डेडिकेटेड हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधा.

मर्चंट हेल्पडेस्क

0120-4440-440

बँक, वॉलेट आणि पेमेंट्स

0120-4456-456

 मुव्हीज आणि इव्हेंट्स तिकिटे

0120-4728-728

पेटीएम मॉल शॉपिंग ऑर्डर्स

0120-4606060

 पेटीएम ट्रॅव्हल तिकिटे आणि फॉरेक्स

0120-4880-880